
महाराष्ट्र हे सर्वार्थाने श्रीमंत राज्य आहे. एखाद्दुसरा उद्योग बाहेर गेल्याने राज्याचे फार नुकसान होणार नाही. दर्या मे खसखस असा हा प्रकार आहे, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज यू टर्न घेतला. कारण प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज ठाकरे यांनीच टीका केली होती.
जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. काय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या 18 क्या जागतिक मराठी संमेलनात रविवारी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि ज्येष्ठ व्यंगयत्रिकार प्रभाकर काईरकर यांनी घेतली. यात राज ठाकरे यांनी सध्याचे राजकारण, बेरोजगारी यांच्याकर भाष्य केले.
गुजरातला प्राधान्य देणे पंतप्रधानांना शोभत नाही
राज्यघटनेने संघ राज्याची चौकट तयार केली आहे. त्याच्याकर आघात करून देशातील एकाच विशिष्ट राज्याला प्राधान्य देणे हे चुकीचे नाही का, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, मी हे आधी बोललो आहे. तेव्हा सर्वांचा शहामृग झाला होता. सगळय़ांनी माना आत घातल्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य हे त्यांच्यासाठी समान मुलासारखे असले पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राधान्य देणे, हे एका पंतप्रधानाला शोभत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.


























































