जरांगे मुंबईत परत का आले शिंदेंनाच विचारा, राज ठाकरे यांनी सुनावले

मराठा आरक्षणासंदर्भात अनेक गोष्टी सगळय़ांना माहीत आहेत. त्यामुळे आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतील. आता आरक्षणाचे आणि जरांगे मुंबईत परत का आले याचे उत्तरही त्यांनाच विचारा, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातूनच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.