राजस्थानातही अरविंद केजरीवालांची जादू, लग्नपत्रिकेत छापलं ‘आय लव्ह केजरीवाल’

582

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच आटपली. या निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला बहुमताने निवडून दिलं. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांच्या या विजयाचा करिष्मा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. फक्त दिल्लीच नाही तर राजस्थानातही केजरीवाल यांना लोकप्रियता मिळत आहे.

i-love-kejriwal

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका लग्नपत्रिकेवर केजरीवाल यांचं नाव छापण्यात आलं आहे. राजस्थानातील जोधपूर येथे एका व्यक्तिने आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेवर आय लव्ह केजरीवाल असं छापलं आहे. दुर्गाराम खाम्भू असं या माणसाचं नाव असून त्याने त्याचा मुलगा निलेश याच्या लग्नपत्रिकेवर आपलं केजरीवाल यांच्याप्रति प्रेम व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर हे कार्ड चांगलंच व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या