अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी शुक्ला कुमार यांचे निधन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि कुमार गौरवची आई शुक्ला कुमार यांचे निधन झाले आहे. या बातमीने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

शुक्ला कुमार यांना सिनेइंडस्ट्रीत त्यांचा साधेपणा आणि शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. पती राजेंद्र कुमार सिनेइंडस्ट्रीत असल्या तरी त्या मात्र लाइमलाइटपासून दूरच होत्या. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबच नव्हे तर, संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्ला कुमार यांची 10 जानेवारी रोजी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, शुक्ला कुमार कायम लाइमलाईटपासून दूर राहिल्या. राजेंद्र कुमार यांच्या करिअरच्या चढ उतारात ती भक्कम पाठिशी होती.