भाजप आमदाराचा शिवराज सिंह यांच्यावर भरोसा नाही, मागितली सोनू सूदकडे मदत

1237

मध्यप्रदेश मधील भाजपसरकार पश्चिम बंगालमधील परप्रांतीय प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवून वाहवा मिळवण्यात व्यस्त आहे. इतर राज्यात अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील लोकांकडे मात्र मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शिवराज सिंह यांच्यावर भरवसा राहिलेला नसल्याने भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र शुक्ला यांनी कोरोना संकटात मुंबईत अडकलेल्या प्रवाशांसाठी अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदत मागितली आहे. प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्यासाठी शिवराजसिंह सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र मुंबई दिल्लीत अडकून पडलेल्या त्यांच्याच राज्यातील प्रवाशांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामध्ये मंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या राजेंद्र शुक्ला यांच्या मतदारसंघातील बहुतांश लोकांचा समावेश आहे. यासाठी शुक्ला यांनी सोनू सूद कडे मदत मागितली आहे. यावरून कॉंग्रेसने तीव्र संताप व्यक्त करत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

भाजप आमदार शुक्ला यांचे ट्विटवर ट्विट
मुंबईत अडकलेल्या रीवा, सतनाम येथील लोकांना परत आणण्यासाठी मदत करा अशी मागणी करणारे ट्विट केले आहे. भाजप आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मंगळवारी रात्री जवळपास तीन डझन लोकांची यादी नावे आणि मोबाईल नंबर सहा ट्विट करत अभिनेता सोनू सूद याला मदतीची विनंती केली.

सोनू सूद ने दिला प्रतिसाद
‘शुक्ला यांच्या ट्विटला सोनू सूदने लागलीच प्रतिसाद देत मुंबईत अडकलेल्या लोकांची काळजी करू नका, त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्यात येईल. उद्या सगळे आपल्या घरी पोहोचतील मध्यप्रदेशला कधी आलो तर पोहे जरूर खायला घाला असे म्हटले आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या