राजेश नार्वेकर राज्याचे परिवहन आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश नार्वेकर यांची राज्याच्या परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज नार्वेकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदावरून त्यांची बदली झाली होती. याशिवाय समीर कुर्तकोटी यांची शुल्क नियामक प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून राजेश नार्वेकर यांनी जबाबदारी पार पाडली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त, सहकार आयुक्त, माहिती-तंत्रज्ञान संचालक म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली. रत्नागिरी आणि रायगड या जिह्यांतही त्यांनी काम पाहिले. ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास या योजना प्रभावीपणे राबवणारे अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 2018 मध्ये राजेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून काम पाहिले होते.