देशात शांतता नांदण्यासाठी कोणतीही भूमिका घेईन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत उसळलेल्या दंगलीनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी देशात शांतता नांदण्यासाठी कोणतीही भूमिका घेईन, असे म्हटले आहे. देशाचा पहिला उद्देश प्रेम, एकता आणि शांती हा असायला हवा, असेही ते म्हणाले. रविवारी रजनीकांत यांच्या निवासस्थानी ‘तामीळनाडू जमात उल उलेमा सबाई’ या संघटनेच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.