
ल घ्यायला पैसे नसल्याने स्वतःला नांगराला जुंपून घेणाऱ्या अंबादास पवार या शेतकऱ्याची व्यथा काय आहे, त्याचा व्हिडीओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावरून शेअर करत मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला काळीज असेल तर बघू तुम्हाला पाझर फुटतोय का, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्याची व्यथा काय ते ऐकवले आहे.
मुख्यमंत्री महोदय तुम्हाला काळीज असेल तर एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या माझ्या मायबाप बळीराजाचे भीषण वास्तव बघा. विधिमंडळामध्ये तुमच्यासह सर्वांना ऐकवा, बघू तुम्हाला पाझर फुटतोय का? वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची चाललेली ही धडपड… अशी पोस्ट राजू शेट्टी यांनी अंबादास पवार या शेतकऱयाचा व्हिडीओसोबत केली आहे.