
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सोमवारी एका रेसलिंग शोदरम्यान विदेशी रेसलरकडून आपटून घेतल्यानंतर आयटम गर्ल राखी सावंत हिने तनुश्री दत्ता हिच्यावर आरोप केले आहेत. त्या विदेशी रेसलरला मला आपटण्यासाठी तनुश्रीने तिला पैसे दिल्याचा आरोप राखीने केला आहे.
रविवारी पंचकुला येथे सुरू असलेल्या रेसलिंगमध्ये रॅव्हल या विदेशी महिला रेसलरने राखीला उचलून जोरात आपटलं होतं. त्यानंतर पोट आणि पाठीला दुखापत झाल्याने राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर राखीने हे आरोप केले आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. त्यात बेडवर आराम करत असलेली राखी आरोप करताना दिसत आहे.
”मी तर नृत्य करण्यासाठी गेले होते. पण त्या वेड्या रेसलरने मला उचलून आपटलं. हे सगळं रॅव्हलने तनुश्रीच्या सांगण्यावरून केलं आहे. मी नृत्य करावं असं तनुश्रीला वाटत नाही. त्यामुळे तिने मला उचलून आपटण्यासाठी रेसलरला पैसे दिले. जेव्हा मी यातून बरी होईन तेव्हा मी दोघींनाही उचलून आपटेन”, असा दावाही राखीने केला आहे.
summary- rakhi blames tanushree for her bad
























































