टकल्या जिथे कुठे भेटशील…..राखी सावंतची अभिनव कश्यपवर असभ्य टीका

ड्रामा क्विन राखी सावंत तिच्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते अभिनव कश्यपवर केलेल्या टिकेमुळे. तिने कायम बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पाठिंबा दिला आहे. राखीने आपल्या आवडत्या भाईजानवर आरोप करणाऱ्या अभिनव कश्यपची चांगलीच फिरकी घेतली आहे. शिवाय टकल्या जिथे कुठे भेटशील तिथे मारेन अशी धमकीही दिली आहे.

मागच्या काही दिवसांपासून ‘दबंग’ सिनेमाचे निर्माता अभिनव शुक्ला  सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर सातत्याने आरोप करत आहे. त्यांच्या वादात आता राखी सावंतने उडी घेत सलमानला पाठिंबा दिला आहे.  राखी सावंतने अभिनववर टिका करत अभिनव हे सर्व पैशांसाठी करत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर अभिनव कश्यप जिथे भेटतील तिथे 10 अंडी तरी फेकून मारेन असेही म्हटले आहे.

राखी सावंतने नुकतेच एका युट्युब पॉ़डकास्टवर सांगितले की, तिच्या अडचणीच्या काळात सलमान खानने तिला खरा आधार दिला. बिग बॉसमध्ये काम दिलं आणि तिच्या आईच्या कर्करोगाच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती. यावेळी राखीने सलमान खानचे आभार व्यक्त करत सलमान तिच्यासाठी देव असल्याचे म्हटले.

सलमान खान घाणेरडा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस; दबंग’च्या दिग्दर्शकाने केले भाईजानच्या फॅमिलीवर आरोप

अभिनव कश्यपबाबत राखीने सांगितले की, सलमान खान आणि 2010 चा हिट सिनेमा ‘दबंग’चे निर्माता अभिनव कश्यप यांच्यातील आरोपप्रत्यारोपशी जोडलेला आहे, अभिनवची विधानं सतत चर्चेत असतात. यावेळी राखी सावंत सलमान खानचा बचाव करताना दिसली.