इंदूरच्या नागरिकाने बांधकामासाठी अयोध्येला पाठवली पोकलेन मशीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील भगवान श्रीरामाचे मंदिर उभारण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदूरच्या देवगुराडिया भागाचे रहिवासी दिनेश बेनीवाल यांनी आपल्या मालकीची मोठी पोवलेन मशीन अयोध्येला पाठवली आहे. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ही मशीन अयोध्येतच राहणार आहे. ही मशीन अयोध्येला पोचल्यावर तिची विधिवत पूजा करून एका धार्मिक समारोहाने राम मंदिराच्या बांधकामाचे सुरुवात होईल अशी माहिती भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी दिली.

अयोध्येत साकारणाऱया राम मंदिराच्या बांधकामातील खारीचा काटा उचलण्याच्या उद्देशाने मी माझी पोकलेन मशीन अयोध्येला पाठवत आहे, असे सांगून इंदूरनिवासी दिनेश बेनीकाल म्हणाले. भगवान रामाच्या मंदिराला सहकार्य करण्याची संधी मला लाभतेय हे मी माझे भाग्यच समजतो. इंदूरहून विशालकाय पोकलेन मशीन मोठय़ा ट्रॉलर ट्रकने अयोध्येला नेण्यात येत आहे. याशिवाय मंदिराचे जुने ढाचे तोडण्यासाठी लागणारे ब्रोकर मशिनही ट्रकने अयोध्येला पाठवण्यात येत आहे असेही बेनीकाल यांनी सांगितले. पोकलेन मशीन अयोध्यात पोचल्यावर विधिवत पूजन करून मशीनच्या साहाय्याने राम मंदिराचा पाया खोदण्याचे काम वेगाने सुरु होईल अशी माहिती श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टने दिली आहे.