राममंदिरासाठी 2.1 टन वजनाची घंटा

567

अयोध्या येथे साकारणार असलेल्या राममंदिरासाठी उत्तर प्रदेश येथे तब्बल 2.1 टन (2100किलो) इतक्या वजनाची घंटा तयार केली जात आहे. येथील एटा जिह्यातील जालेसर या गावात या घंटा निर्मितीचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी हिंदू आणि मुस्लिम कामगार एकत्र आले आहेत. या घंटेचा घंटानाद  तब्बल 15 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार आहे.

जालेसर महापालिकेचे अध्यक्ष विकास मित्तल यांनी या घंटेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, ही घंटा अष्टधातूपासून बनविली जात आहे. ज्यात सोने, चांदी, कॉपर, जिंक, लेड, टीन आणि मर्क्युरीचा वापर केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या