6 डिसेंबरपासून राममंदिराचे बांधकाम सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येमध्ये 6 डिसेंबरपासून प्रत्यक्ष राममंदिर उभारणीचे काम सुरू होईल असा विश्वास भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केला आहे. हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप यायचा आहे. त्याआधीच न्यायालय राममंदिराच्या बाजूनेच निर्णय देईल असा दावा साक्षी महाराज यांनी केला आहे.