
5 ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. देशभरातील रामभक्तांनी, असंख्य हिंदूंनी त्यांच्या भागात शक्य होईल तसा याबद्दल जल्लोष व्यक्त केला. मध्य प्रदेशातील खरगोन भागामध्येही काही तरूण आणि व्यापारी जल्लोष करण्यासाठी जमले होते. या तरुणांची तिथल्या पोलिसांनी जबरदस्त धुलाई केली. पोलिसांनी केलेल्या या धुलाईमुळे भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय संतापले असून त्यांनी मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे. ‘तुमच्या पोलिसांना समजवा’ असं विजयवर्गीय म्हणाले आहेत.
विजयवर्गीय यांनी हा इशारा देताच उपविभागीय पोलीस अधिकारी ग्लॅडमीन एडवर्डकार आणि उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांना पदावरून दूर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी या दोघांना हटवावं ही मागणी करत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली होती.
काय घडलं होतं
बुधवारी राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त जल्लोष करणाऱ्या व्यापारी आणि तरुणांना उपविभागीय पोलीस अधिकारी ग्लॅडमीन एडवर्डकार यांनी चोपलं होतं. हे सगळंजण फटाके फोडत असताना ही कारवाई करण्यात आली. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी तिथल्या व्यापाऱ्यांनी गुरुवारी बाजारपेठ बंद ठेवली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी ही कारवाई अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने कहा है आज देश के लिए गौरव का दिन है। अयोध्या में राम मंदिर का शिलान्यास हुआ! सारा देश खुशियाँ मना रहा है। ऐसे में खरगोन के सराफा बाजार में उत्सव और खुशियाँ मनाते युवकों पर पुलिस कार्रवाई अनुचित है। pic.twitter.com/LiywpY7mgt
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) August 5, 2020
विजयवर्गी यांनी प्रश्न विचारला आहे की ‘खरगोनमधले पोलीस बंगाल पोलिसांसारखे का वागत आहेत ?नरोत्तम मिश्रा तुमच्या पोलिसांना जरा समजवा’


























































