राममंदिरासाठी विटा पाठवल्या तशा नोटा पाठवा, ट्रस्टच्या कोषाध्यक्षांचे आवाहन

529

अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील रामभक्तांनी विटा पाठवल्या होत्या तशाच आता नोटाही पाठवण्यात याव्यात, असे आवाहन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी केले आहे.

अडीच महिन्यांनंतर अयोध्येत मंदिर उभारणीचे काम सुरू होईल आणि ते तीन वर्षांत पूर्ण करायचे आहे. यापूर्वी मंदिरासाठी घराघरातून एक-एक वीट पाठवली गेली होती. तशाच आता नोटा पाठवून मंदिर निर्मितीला सर्वांचाच हातभार लागावा, असे गिरी यांनी म्हटले आहे. कितीही छोटी-मोठी रक्कम ऑनलाइन स्वीकारण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने ट्रस्ट बनवून त्यांचे काम पूर्ण केले. आता संत समाजाला पुढचे काम करायचे आहे आणि त्यासाठी देशातील नागरिकांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या