माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा; रमाधाममध्ये मातृशक्तीला अभिवादन

लाखो शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांच्या 95 व्या जन्मदिनानिमित्त खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमात माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत मातृशक्तीला अभिवादन करण्यात आले. माँसाहेबांच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या. भक्तिगीते, भजनांच्या सुरांनी रमाधामचा अवघा परिसर भक्तिमय झाला होता.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांची भव्य वृद्धाश्रम उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. या पवित्र वास्तूशी अनेकांचे भावनिक नाते जोडले गेले असून आजी-आजोबांची ममतेने सर्व प्रकारची काळजी घेण्यात येते. ममतादिनी खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमातही आज सकाळपासून मातृशक्ती व भक्तीचा अनोखा संगम पहायला मिळाला. रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी शहरप्रमुख संतोष देशमुख, विलास चाळके, छगन राठोड, राजू पिंगळे, गाडे मामा व आजी, आजोबा मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

श्रीगणेश आणि गोमातेचे पूजन

रमाधामच्या परिसरात एक गणेश मंदिर असावे आणि त्यापुढे एका गोमातेचे पालन व्हावे अशी माँसाहेबांची इच्छा होती. त्यानुसार एक गणपती मंदिर उभारण्यात आले. आज ममतादिन आणि अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून या मंदिरातील गणेशाचे आणि त्यापुढे विराजमान झालेल्या गोमातेचे पूजन चंदूमामा वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाप्रसादही अर्पण करण्यात आला. रमाधाम हे भक्ती आणि मातृशक्तीचे प्रतीक आहे. शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांची समाजसेवेची परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायमच जपली आहे, असे उद्गार चंदूमामा यांनी काढले. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसेला भरघोस यश मिळू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी श्रीगणेशाकडे केली.

भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सक्रिय सदस्य विष्णू पवार हे न्यू इंडियातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी न्यू इंडिया भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, अध्यक्ष अजय गोयाजी, तीर संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश भांगे, ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष आल्हाद नाईक,  विनोद येरुणकर आदी उपस्थित होते.