‘दलित’ शब्द हा व्यवहारात असायलाच हवा – रामदास आठवले

1103
रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री

शासकीय नोंदीमध्ये जातीचा उल्लेख करताना ‘दलित’ हा शब्द यापूर्वीही वापरला जात नव्हता. त्यामुळे शासकीय नोंदीमध्ये ‘दलित’ शब्दाला मनाई ठीक आहे, मात्र व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांमध्ये ‘दलित’ शब्दाला मनाई करता कामा नये. ‘दलित’ शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच भारतीय दलित पँथर या संघटनेची आम्ही स्थापना केली होती. माझ्या मते ‘दलित’ शब्द व्यवहारात असायलाच हवा असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महाराष्ट्र शासनाने सरकारी कागदपत्रांतून ‘दलित’ शब्द वापरण्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. याबाबत रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना व्यवहारात ‘दलित’ शब्द असायलाच हवा अशी भूमिका मांडली आहे. बोलण्यामध्ये भाषणांमध्ये वृत्तपत्र मीडिया माध्यमांमध्ये ‘दलित’ शब्द वापरण्यास मनाई करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे व्यवहारात ‘दलित’ शब्द असायलाच हवा. सरकारी दस्तऐवजांमध्ये यापूर्वीपासून ‘अनुसूचित जाती’ हा शब्दप्रयोग केला जात असल्याचे सांगत व्यवहार ‘दलित’ शब्दाला मनाई नसावी असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या