केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिबट्या घेतला दत्तक

2143

नेहमीच आपल्या राजकीय कवितांमुळे चर्चेत असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रामदास आठवले यांनी एका दीड वर्षाचा बिबट्याला दत्तक घेतले असून सगळीकडे याची चर्चा होत आहे. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या बिबट्याला त्यांनी दत्तक घेतेले आहे. ‘तुमचे जीवन होईल मंगल जर तुम्ही वाचविले जंगल’, अशी चारोळी करून वन्यजीवांचे पर्यावरणाचे रक्षण करा. त्यासाठी वृक्षरोपण करा प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात किमान दहा झाडे तरी लावावीत, असे यावेळी आयोजित कार्यक्रमात आठवले म्हणाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदास आठवले यांनी सुपूत्र जित आठवले यांच्या आग्रहास्तव बिबट्या दत्तक घेतले आहे. जीत आठवले यांनी या बिबट्याचे नाव ‘सिंबा’ असे ठेवले आहे. याआधी रामदास आठवले यांनी ‘भीम’ नावाचा बिबट्या दत्तक घेतला होता. भीम या बिबट्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर वन विभागाविरुद्ध आरपीआयतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. वन्य प्राणी दत्तक योजनेत दत्तक घेतलेल्या या बिबट्याच्या सांभाळासाठी आठवले यांनी वार्षिक एक लाख २० हजार रुपये शुल्काचा धनादेश उद्यान प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या