महाराष्ट्रात फक्त मराठी बोलायला लावणे हे घटनाविरोधी- रामदास आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठीतून बोलण्याचा आग्रहर केल्यामुळे सराफा व्यावसायिकाने केलेल्या अपमानाचे सर्वत्र पडसाद उमटत असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपांईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात मराठीची सक्ती करणे किंवा फक्त तीच भाषा बोला, असा आग्रह धरणे घटनाविरोधी असल्याचे सांगितले.

सगळ्यांनाच डोकं आहे त्यामुळे बिनडोक म्हणणं चुकीचे

मराठा आरक्षणावरून खासदार उदनयराजे व खासदार संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली होती. बिनडोक पणाची उपमाही त्यांनी दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनाही आठवलेंनी चांगलाच टोला लगावला. सगळ्यांनाच डोकं आहे त्यामुळे कोणालाही बिनडोक म्हणता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजांनी आरक्षणावरून वाद घालू नये, असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.