रणबीर-आलियाची लग्नपत्रिका झाली व्हायरल

988

गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. एकमेकांबाबत, आपल्या प्रेमाबाबत आणि आपल्या लग्नाबाबत हे दोघेही उघड काही बोलत नसले तरी बॉलीवूडमधल्या प्रत्येक सोहळ्याला ते एकत्रच दिसतात. त्यावरून त्यांच्या लवकरच लग्नाची न्यूज खरी असावी. त्यातच आता रणबीर आणि आलिया यांची लग्नपत्रिका नुकतीच सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेत म्हणे त्यांच्या लग्नाची तारीख, ते कुठे होणार ते स्थळ आणि लग्नघटिकाही देण्यात आली आहे. आता ही पत्रिका खरी मानायची की नाही हा मोठा प्रश्न पडलाय. वास्तवात ती त्यांच्या कुण्या चाहत्याने बनवलेली असल्याने ती खोटी आहे हे नक्की. शिवाय पत्रिकेत आलिया ही मुकेश भट्ट यांची कन्या असं धडधडीत लिहिण्यात आले आहे. खरं तर ती महेश भट्ट यांची मुलगी असून मुकेश भट्ट तिचे काका आहेत. लग्नाचा आपण अजून विचार केलेला नाही असे आलिया भट्ट सारखी म्हणतेय.

आपली प्रतिक्रिया द्या