Ranji Trophy 2025-26 – मुंबईच्या संघाची घोषणा, लॉर्ड शार्दुलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा

Ranji Trophy 2025-26 साठी मुंबईच्या तडफदार संघाची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या धारधार गोलंदाजीने फलंदाजांना पायात बेड्या ठोकणाऱ्या शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबरी अनुभवी अजिंक्य रहाणेची सुद्धा संघात निवड करण्यात आली असून सध्या चांगल्या फॉर्मात असलेल्या सरफराज खानला सुद्धा संघात स्थान देण्यात आलं आहे.

रणजी करंडकाचा थरार हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुंबईसह एकूण 38 संघ विजेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईचा साखळी फेरीतील पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान जम्मू काश्मीरशी होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 25 ऑक्टोबरपासू छत्तीसगडविरुद्ध, तिसरा सामना 1 नोव्हेंबर पासून राजस्थानविरुद्ध, चौथा सामना 8 नोव्हेंबर पासून हिमाचल प्रदेशविरुद्ध आणि पाचवा सामना पाँडिचेरीविरुद्ध 16 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.

रणजी करंडकासाठी मुंबईचा संघ

शार्दुल ठाकूर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तोमोरे (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, शिवम दुबे, सरफराज खान, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, मुशीर खान, इरफान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.