संभाजीनगर – 5 लाखांची खंडणी उकळणाऱ्या साप्ताहिकाच्या पत्रकाराला मुलासह अटक

1281

वाईन शॉपीच्या मालकांकडून 5 लाख रुपयाची खंडणी उकळणाऱ्या साप्ताहिकचा पत्रकार जगन किर्तीशाही आणि त्याचा मुलगा मिलिंद या दोघांना पुंडलिक नगर पोलिसांनी बीड बायपास रस्त्यावरील हॉटेल मध्ये सापळा रचून खंडणी उकळताना रंगेहाथ पकडले.

जवाहर कॉलनी परिसरातील मित्र नगरमध्ये राहणारे प्रदिप लालचंद मणकानी यांचे त्रिमूर्ती चौकामध्ये लक्की वाईन शॉपी देशी – विदेशी दारू विकण्याचे दुकान होते. ते दुकान त्यांनी एक वर्षापूर्वी बीड बायपास रस्त्यावरील मास्टर कुवूâ हॉटेल समोर स्थालांतारित केले. एक किलो मिटरच्या आत देशी दारुचे दुकान असले तर दुकान सुरू करता येत नाही असा नियम आहे. या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वाईन शॉपी चालक मणकानी यांच्याकडे साप्ताहिक पत्रकार जगन सुकाजी किर्तीशाही (55) आणि त्याचा मुलगा मिलिंद (32) दोघे रा. संसारनगर याने 5 लाखांची खंडणी मागितली होती. त्यावेळी मणकानीने यामध्ये तडजोड करून 5 ऑक्टोंबर रोजी रोख 50 हजार रुपये देत हे प्रकरण येथेच थांबविण्याची विनंती केली होती. मात्र किर्तीशाही ची मागणी वाढतच गेली त्याने पुन्हा पैसाची मागणी केल्यामुळे मणकानी यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन साप्ताहिक पत्रकार जगन किर्तीशाही विरोधात तक्रार दिली.

बुधवारी मणकानी यांना किर्तीशाही ने मोबाईलवर कॉल करून पैसाची मागणी केली त्यावेळी त्याने बीड बायपास रस्त्यावरील हॉटेल नंदिनी मध्ये बोलवले. किर्तीशाही आणि त्याचा मुलगा मिलिंद हे दोघे आले. मणकानीने 4 लाख रुपयाच्या बनावट नोटांचे बंडल देताचा दबा धरून बसलेल्या पोलिसांनी खंडणी बहाद्दर जगन आणि मिलिंदला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून बनावट चलनातील 500 रुपयाच्या 16 नोटा आणि उर्वरित 3 लाख 92 हजार रुपये बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, मिरा चव्हाण, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे या पथकाने ही कामगिरी बजावली.

आपली प्रतिक्रिया द्या