आधी उद्धट वागणूक आणि आता मेकअप.. रानू मंडल पुन्हा झाली ट्रोल!

15312

सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार सिंगर बनलेल्या रानू मंडल हल्ली गाण्यापेक्षा बदललेल्या वागणुकीमुळेच जास्त चर्चेत असते. अनपेक्षितपणे अल्पावधीतच पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्याने रानूचा स्वभावच बदलला आहे. काही दिवसांपू्र्वी एका चाहतीने अंगाला हात लावल्याने रानू भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रानू मीडियावाल्यांना अॅटीट्यूड दाखवत असल्याचा व्हिडीओही चांगलाच गाजला होता. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

आता पुन्हा रानू चर्चेत आली असून यावेळी तिचा मेकअप नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. एकेकाळी दारिद्र्य पाहणाऱ्या रानू मंडलला प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिचं राहणीमान बदललं आहे. नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात तिने अति प्रमाणात मेकअप  केल्याचं दिसून येत आहे. मूळची सावळी असलेली रानू या मेकअपमुळे पांढरी फटक दिसत असल्याने नेटकरी तिला ट्रोल केलं आहे.

हे फोटो रानू मंडल पाहुणी म्हणून गेलेल्या कानपूर येथील एका ब्युटी पार्लरचे आहेत. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही मेकअप आर्टिस्टनी तिला मेकअप केला. मात्र, मेकअपमुळे ती सुंदर न दिसता विचित्र दिसू लागली. त्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवणाऱ्या कमेंट्स आणि मीम्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या