
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची बॉलिवूडच्य़ा हॉट कपलमध्ये गणना होते. हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याचमुळे पद्मावत चित्रपटानंतर दीपिकाने कोणताही चित्रपट स्वीकारला नाही अशीही चर्चा सुरू आहे. नुकत्याच हिंदुस्थान टाइम्स समिटमध्ये दिसलेल्या या कपलला पत्रकारांनी त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. दोघांनीही दिलखुलासपणे या प्रश्नांची उत्तरे दिली.
KBC 10 : जेव्हा बिग बी अभिषेक बच्चनचा आवाज ओळखत नाहीत
रणवीर आणि दीपिकाला तुम्ही कधी लग्न करत आहात असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले. याबाबत तर तुम्ही रोज वाचत आहात. बातम्यांमध्येही पाहात आहात. माझ्या तर लग्नातील शेरवानीचा कलर आणि मला मिळणाऱ्या गिफ्टबाबतही सर्व ठरले आहे. परंतु जेव्हा खरंच असं जेव्हा असे होईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला याची माहिती मिळेल, असे रणवीर म्हणाला. तसेच नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्यात आले का या प्रश्नावर दीपिका म्हणाली की, आतापर्यंत तर आमचे अनेकवेळा नोव्हेंबरमध्ये लग्न झाले आहे. तर रणवीर म्हणाला की, काही रिपोर्टनुसार तर आमचे लग्नही झाले असून आमच्या आयुष्यात यापेक्षा अधिक काही झालं असेही दाखवले जात आहे.
यानतंतर रणवीरला दीपिकासोबतच्या पहिल्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना रणवीर म्हणाला की, मी पहिल्यांदा तिला एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो आणि तिला पाहून हरवून गेलो. एखादी व्यक्ती इतकी सुंदर कशी असू शकते, असा विचार माझ्या मनात आला, असेही तो म्हणाला.
दरम्यान, दीपिकाने आपल्या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली. यात ती एका अॅसिड अटॅक पीडितेची भूमिका साकारणार आहे. तर रणवीर रोहित शेट्टीच्या सिंबा या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेत गली बॉय हा चित्रपटही त्याला प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. तसेच कपील देव यांच्या बायोपिकमध्ये रणवीर दिसणार असल्याच्याही वावड्या उठत आहेत.


























































