
सामना ऑनलाईन । मुंबई
‘कौन बनेगा करोडपती’चा दहावा सिझन सुरु असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात घडलेले अनेक किस्से लोकांसोबत शेअऱ करत आहेत. शो दरम्यान बिग बी हे स्वत: देखील आपल्या कुटुंबातील काही गोष्टी लोकांसमोर मांडत असतात. बिग बी आणि अभिषेक बच्चन यांच्यातही चांगले जमते. दोघांमध्ये नाते बाप-बेट्यापेक्षा मित्रत्वाचे अधिक आहे. परंतु गुरुवारी झालेल्या एपिसोडदरम्यान असे काही घडले की लोकं क्षणभर बुचकाळ्यात पडले. बिग बी शो दरम्यान मुलगा अभिषेक बच्चन याचा आवाज ओळखू शकले नाहीत.
KBC : सात कोटींच्या प्रश्नाचे ‘योग्य उत्तर’ देऊनही बिनिता जैन हरली
गुरुवारी प्रसारीत झालेल्या शोमध्ये हॉट सिटवर रश्मी रावत होती. तिला एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली आणि यात कोणता अभिनेता पहिल्या चित्रपटातील संवाद म्हणत आहे असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, अजय देवगन आणि ऋतिक रोशन हे चार पर्याय देण्यात आले होते. रश्मीने अभिषेक बच्चन हे उत्तर दिले आणि 40 हजार जिंकले. परंतु हा आवाज अभिषेक बच्चनचा आहे याबाबत अमिताभ यांनाही माहीत नव्हते. रश्मीच्या उत्तरानंतर बिग बी काही वेळाने म्हणाले की, हा आवाज त्याचा (अभिषेक बच्चन) असेल याच मलाही अंदाज नव्हता. रश्मीला ऐकवण्यात आलेली ऑडिओ क्लिप अभिषेक बच्चनच्या पहिल्या चित्रपटातील (रिफ्यूजी) होती.


























































