
रणवीर सिंह, अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ चित्रपट हिंदुस्थानसह परदेशातील चित्रपटगृहांत दमदार कमाई करत आहे. पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाने जगभरात 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे, परंतु गल्फमधील सहा देशांमध्ये ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला नाही. या देशांनी या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी मंजुरी दिली नाही. ज्या देशांत हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही, त्यामध्ये सौदी अरब, बहरिन, कुवेत, ओमान, कतार आणि यूएई या सहा देशांचा समावेश आहे. या चित्रपटाला पाकिस्तानविरोधी चित्रपट म्हणूनही पाहिले जात आहे. गल्फमधीलही सहाच्या सहा देशही मुस्लिम देश आहेत. गल्फमध्ये ‘धुरंधर’ला प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आखाती देशात हा चित्रपट प्रदर्शित करू न दिल्याचे कोणतेही कारण समोर आले नाही. ‘धुरंधर’आधीही काही चित्रपटांना या देशांमध्ये प्रदर्शित होऊ दिले नाही. ‘धुरंधर’साठी प्रमुख अभिनेता रणवीर सिंह याला 40 ते 50 कोटी रुपये ही दिली आहे. तर या चित्रपटात सर्वांत जास्त भाव खाऊन गेलेला अक्षय खन्ना याला केवळ दोन ते अडीच कोटी रुपये दिल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

























































