रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गरोदर झाल्यावर घटना उघड

31
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधीरत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करून कडक शासन करावे असे आवाहन ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केले आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात राहाणाऱ्या १३ वर्षाच्या गरीब मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार करण्यात आला. ही मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गेले सहा महिने यामुलीवर अत्याचार होत होता. जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनोद वाकोडे आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात अजून काही आरोपी असून त्यांना अटक करावी अशी मागणी करणारे निवेदन पं.स.सदस्या साक्षी रावणंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या