वन्यजीव संशोधन मोहिमेदरम्यान तुंगारेश्वर अभयारण्यात दुर्मिळ उंदीर हरणाने दर्शन दिले. अत्यंत लाजाळू आणि निशाचर स्वभावाचे हे हरण असून ते हिंदुस्थानातील सर्वात लहान हरण प्रजातींपैकी एक आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डायरेक्टर अनिता पाटील यांच्या आदेशानुसार विवेक फाऊंडेशनचे फिल्ड इकोलॉजिस्ट रोविन तोडणकर यांचे नॅशनल पार्कमधील गवत आणि प्राण्यांच्या विविध प्रजातींचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणादरम्यान त्यांना उंदीर हरण आढळले. ठिपकेदार शेवरोटेन अशी ओळख असलेल्या हरणाच्या शरीराची लांबी साधारण २३ इंच (५७.५ सेमी) असून शेपटी फक्त १ इंच (२.५ सेमी) इतकी असते. त्याचे वजन सुमारे तीन किलोपर्यंत असल्याची माहिती रोविन तोडणकर यांनी दिली.