राशिद खानची टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रीकची ‘हॅटट्रीक’, वर्ल्डकपपूर्वी क्रीडा जगतात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्ताचा फिरकी गोलंदाज राशिद खान सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लिग (बीबीएल) स्पर्धेत जलवा दाखवत आहे. या स्पर्धेत अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना राशिद खान याने हॅटट्रीकची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियात याच वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपूर्वी राशिद खान याने हॅटट्रीकची नोंद केल्याने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. या वर्ल्डकपमध्ये प्रत्येक संघ राशिदच्या गोलंदाजीचा विशेष अभ्यास करून उतरेल हे नक्की.

बिग बॅश स्पर्धेतील 27 व्या लढतीत अॅडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना खेळला गेला. या लढतीमध्ये राशिद खान याने टी-20 क्रिकेकटमधील तिसऱ्या हॅटट्रीकची नोंद केली आहे. याआधी राशिद खाने याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूवर चार विकेट्स घेत विक्रम केला होता. यानंतर 2017 ला कॅरेपियन प्रीमिअर लिग (सीपीएल) स्पर्धेत राशिदने हॅटट्रीक नोंदवली होती.

राशिद खाने याने 11 व्या षटकामध्ये पाचव्या चेंडूवर जेम्स विन्स आणि सहाव्या चेंडूवर जॅक अॅडवर्ड्सची विकेट्स घेतल्या. यानंतर 13 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जॉर्डन सिल्कची विकेट घेत हॅटट्रीक पूर्ण केली. राशिदने या लढतीत 4 षटकांच्या गोलंदाजीत 22 धावा दिल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. राशिदने हॅटट्रीकची नोंद केली असली तरी अॅडलेड स्ट्रायकर्सने हा सामना 2 विकेट्सने गमावला.