स्त्री शक्तीचा सन्मान, रश्मी ठाकरे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 217 च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘स्त्राr शक्ती सन्मान 2025’ प्रदान करण्यात आला. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

शाखाप्रमुख शशिकांत पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. मॅकीचेन हॉल विल्सन कॉलेज येथे रंगलेल्या सोहळ्यात विभागातील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्याला विभागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाच्या विजेत्या महिलांना विविध पारितोषिक देऊन तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरविंद दुधवडकर, राजकुमार बाफना, विभाग प्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई संघटक माई परब, विधानसभा प्रमुख अॅड. भैरुलाल चौधरी, विधानसभा संघटक गणेश सानप, उपविभागप्रमुख कृष्णा दादा पोवळे, राजेश आवळेगावकर, विधानसभा समन्वयक दिलीप सावंत, सहसमन्वयक गजाजन भोसले, विनोद लोटलीकर, अभिजीत गुरव, किरण बाळसराफ, महिला विधानसभा प्रमुख अरुंधती दुधवडकर, पल्लवी सकपाळ, गायत्री आवळेगावकर, जयश्री बाळ्ळीकर, माजी नगरसेविका सुजाता सानप, विधानसभा संघटक सुरेखा उभाळे, माजी नगरसेविका जया गोयथळे, लतिका पाष्टे, आरती लोटणकर, उपविभाग संघटक वर्षा साबळे, शाखाप्रमुख वैभव मयेकर, स्वप्नील कोळी, राजेश हजारे, राजेंद्र गायकवाड, नीलेश अहिरेकर, महेंद्र कांबळी, प्रभाकर पास्टे, युवासेना विस्तारक प्रथमेश सकपाळ, युवासेना विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर, शाखा संघटक रूपाली बुरमेकर आणि रेखा पवार तसेच विभागातील आजी माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.