
सामना प्रतिनिधी। वाढवणा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाढवणा बु. येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नांदेड – बिदर राज्यमार्गावरील वाढवणा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाढवणा बु. येथे बुधवारी सकल मराठा संघटना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला होता.. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर वाढवणा पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तीन तास या ठिकाणी वाहतूक अडवण्यात आलेली होती. ९ ऑगस्ट नंतर अतिशय उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
summeary…maratha protest at nanded





























































