
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेने आज त्यांच्या रेपोदरात कपात केली आहे. त्यामुळे आता कर्ज स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केल्यामुळे रेपो रेट 6.25 वरून 6.00 टक्क्यांवर आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर कर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे. आता बँका रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटनुसारच कर्जाचे हप्ते ठरवणार असल्याने ईएमआय कमी होणार आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज स्वस्त झाल्याने घर घेणे सुलभ होणार आहे.
RBI cuts repo rate by 25 base points to 6% from 6.25% pic.twitter.com/tnYzGGmFt1
— ANI (@ANI) April 4, 2019
रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मुद्रा नीती समितीची (एमपीसी)च्या 2019-20 या आर्थिक वर्षातील पहिल्या द्वैमासिक आढाव्यात रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी रेपो रेट कमी करण्याला सहमती दर्शवली. तसेच 2019 साठी सकल देशातंर्गत उत्पादनाचा (जीडीपी) विकासदर 7.2 वरून कमी करून तो 7 टक्के करण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद स्वीकारल्यानंतर दास यांनी घेतलेली ही दुसरी एमपीसी बैठक आहे.
GDP projection for 2019-20 is kept at 7.2% , earlier projection was of 7.4%. pic.twitter.com/f2genxTP7n
— ANI (@ANI) April 4, 2019
रेपो रेटवरून व्याजदर निश्चित करण्यात येतात. त्यानुसार रिझर्व्ह बँक इतर बँकांना फंड उपलब्ध करून देतात. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आल्याने बँकांना स्वस्तात निधी मिळणार आहे. त्यामुळे आता इतर बँकांही कर्जदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज यासह इतर कर्ज स्वस्त होणार आहेत. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे. तर कर्ज घेतलेल्यांच्या कर्जाच्या हप्तांमध्ये घट होणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षातील हा पहिलाच द्वैमासिक आढावा आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली होती. त्याआधी तीनवेळा रिझर्व्ह बँकेने रेपो रोट जैसे थे ठेवले होते. दरम्यान, समितीने धोरणात कोणताही बदल केलेला नाही. सध्याची मुद्रा स्थिती बघता बँक तटस्थ धोरण सेडून उदार धोरण स्वीकारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.























































