कारमधून दारूची वाहतूक, दोघांना सव्वा लाखाच्या मालासह पकडले

643

निवळी-जयगड मार्गावर गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून 1 लाख 26 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची टीम निवळी-जयगड दरम्यान सोमवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना एक अल्टो कार (12 एफ.पी. 7357) ही भरधाव वेगाने जाताना दिसून आली. पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्या कारचा पाठलाग केला. चाफे तीठ्यावर ही कार भरारी पथकाने अडवली. त्यावेळी गाडीची तपासणी केली असता कारमध्ये 40 लि. मापाच्या गावठी हातभट्टी दारुने भरलेल्या 7 रबरी टयुब व अंदाजे 30 लि मापाचे प्लॅस्टिकचे 7 कॅन व अंदाजे 20 लि. मापाची एक गावठी हातभट्टी दारुने भरलेली रबरी टयुब अशी एकूण 510 लि. गावठी हातभट्टी दारु मिळून आली.

लाखो रुपयांची दारू मिळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाच्या भरारी पथकाने कार मधील मिनार रायबा पाटील, रा. मिरजोळे – पाटीलवाडी ता. जि. रत्नागिरी व शुभम सुरेश वरेकर, रा. मजगाव, किर्तीनगर ता. जि. रत्नागिरी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गावठी हातभट्टी दारुची बेकायदेशीरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 ( अ ) ( ई ) 81, 83 व 90 अन्वये गुन्हा नोंद करुन त्यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टी दारु व वाहनांसह 1 लाख 26 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई विभागीय उप- आयुक्त वाय.एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी अधीक्षक, डॉ. बी. एच. तडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भरारी पथकचे निरीक्षक शरद अंबाजी जाधव, जवान मानस पवार, वैभव सोनावले यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या