रत्नागिरी शहरातील 50 टक्के परिसर क्लोजडाऊन

256

कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यामुळे राजिवडा परिसर पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आला असून रत्नागिरी शहराचा ५० टक्के परिसर बंद करण्यात येणार आहे. या कारवाईनंतर रत्नागिरीकरांनी घाबरून जाऊ नये.जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरूच रहाणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

मरकजवरून रत्नागिरीत आलेला एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. असे जे कोण लोक बाहेरून आले असतील त्यांनी स्वताहून पुढे यावे असे आवाहन करताना जे लोक नंतर सापडतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशारा मिश्रा यांनी दिला आहे.

राजिवडा परिसर पूर्णत: बंद करण्यात आला असून शहरातील 50 टक्के परिसर बंद करत आहोत. यापूर्वीपेक्षा अधिक कड़क कारवाई आम्ही शहरात करणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.यापूर्वी शृंगारतळी येथे एक रूग्ण सापडला असून त्याच्यावर उपचार करून तो बरा झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी.संचारबंदीचे पालन करावे असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या