लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यपकाकडून अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी प्राध्यापकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2021 ते 2026 या कालावधीत घडली आहे.

संशयित प्राध्यापकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दरम्यान याबाबत पिडीतेने आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.