रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 22 कोरोनाबाधित रूग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

रत्नागिरी जिल्ह्यात आज तब्बल २२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४ वर पोहचली असून जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधित रूग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सायंकाळी २४ तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी २२ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील ११ रूग्ण असून पुरूष ७ आणि महिला ४ आहेत.रत्नागिरी तालुक्यात ७ रूग्ण सापडले असून त्यामध्ये महिला ४ आणि पुरूष ३ आहेत.दापोली तालुक्यात ४ रूग्ण सापडले असून चारही पुरूष रूग्न आहेत