रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, खेड येथे उपचार सुरु असताना मृत्यू

1000

रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील कळंबणी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  या रुग्णाचे वय 50 होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे. हा कोरोनाबाधित दुबईतून आला होता अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात 4 कोरोनाबाधित रूग्ण सापडले होते.त्यापैकी खेड तालुक्यातील कळंबणी येथे 6 एप्रिल रोजी एक रूग्ण दाखल झाला होता. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.आज कळबंणी रूग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. जिल्हयातील होम क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 1021 आहे. या सर्वांवर लक्ष ठेवण्यात आलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या