
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार… गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणपतीबाप्पाचे आज रविवारी सायंकाळपासूनच वाजत गाजत आगमन सुरु झाले. रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा 1 लाख 66 हजार 587 घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे तर 111 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत.
उद्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. कोकणामध्ये घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी मंडळी घरगुती गणपतीचे मखर सजवण्यात दंग असतात. काही घरामध्ये देखावेही उभारले जातात़ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही गणेशोत्सव दिमाखात साजरे करतात. सार्वजनिक मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 587 घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 25880 गणेशमूर्ती, संगमेश्वर तालुक्यात 26057 गणेशमूर्ती, राजापूर तालुक्यात 27265 गणेशमूर्ती, लांजा तालुक्यात 13540 गणेशमूर्ती, चिपळूण तालुक्यात 32354 गणेशमूर्ती, खेड तालुक्यात 13725 गणेशमूर्ती, मंडणगड तालुक्यात 5149, दापोली तालुक्यात 12771 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 111 ठिकाणी सार्वजनिकगणेशोत्सव साजरे होणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरीमध्ये 33, संगमेश्वरमध्ये 8, राजापूरमध्ये 8, लांजामध्ये 6, चिपळूणमध्ये 19, गुहागरमध्ये 2, खेडमध्ये 17, दापोलीमध्ये 10, मंडणगडमध्ये 8 सार्वजनिकं गणेशोत्सव साजरे होणार आहेत.
प्रशासन सज्ज
मुंबई-गोवा येथे खेड ते राजापूर खारेपाटण या 213 किंमी महामार्गावर एकूण 15 मदत केंद्रे व 4 चेकंपोस्ट उभारण्यात आली आहेत. या मदत केंद्रामधून महामार्गावर मुंबईतून येणार्या गणेभक्तांना प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच प्रत्येक मदतकेंद्रावर गणेभक्तांच्या माहितीकंरीता पोलीस विभाग, नियंत्रण कंक्ष, गॅरेजेस, रुग्णवाहिका क्रेन यांचे संपर्क क्रमांकांचे फलक लावण्यात आले आहेत. महामार्गावरील उभारण्यात आलेल्या मदत केंद्रांमध्ये पोलीस विभागाचे 8 अधिकारी आणि 90 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात बंदोबस्ताकंरीता 58 पोलीस अधिकारी आणि 700 पोलीस कंर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या बाहेरून 10 अधिकारी, 100 पोलीस कर्मचारी, 350 होमगार्ड तसेच 01 एसआरपीएफ कंपनी असा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.




























































