मुंबई-गोवा महामार्गावर LPG गॅस वाहून नेणारा टँकर उलटला, हायवेवरील वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे LPG गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाला आहे. हा टॅंकर पुलावरून खाली कोसळल्याचे वृत्त आहे. टॅंकर कोसळल्यानंतर गॅस टॅंकरमधून लिक झाल्यामुळे, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सदर घटना ही सोमवार मध्यरात्रीच्या सुमारास (28 जुलै) घडली असून, अपघाताची माहिती मिळताच, एमआयडीसीच्या रेस्क्यू टीमने गॅस गळती थांबवली आहे. तसेच यासंदर्भात जवळच्या नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर उलटलेल्या टॅंकरमधील वायु काढण्याचे काम सुरू; 9 तास वाहतूक ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 7 तासांपासून हा महामार्ग ठप्प झालेला आहे. अपघातानंतर आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील 2 महिन्यात अशा प्रकारच्या अपघाताची ही दुसरी घटना आहे. अपघातानंतर हातखंबा गावातील वाणी पेठ या परिसरातील किमान 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम करण्यात आलेले आहे.