उद्यापासून सुरू होणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 18 ठिकाणी मदतकेंद्र स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता एसआरपीएफ आणि होमगार्डची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. महामार्गावर कशेडी, चिपळूण, हातखंबा येथे 124 नियमित आणि बाहेरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.