विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

641

रत्नागिरी तालुक्यातील खानु कोंडवाडीतील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने जीवदान दिले आहे. वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या वाचवण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खानू गावातील अनंत सुवारे यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. सुवारे हे सकाळी विहिरीकडे गेले असता त्यांना त्यांच्या विहिरीत एक बिबट्या पडलेला आढळला. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला कळवली असता वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर करण्यासाठी प्रथम फळीचा वापर केला. मात्र फळीच्या साहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यास अपयश आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडला. पिंजरा सोडला असता काही वेळाने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि त्याला दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या 3 वर्षांचा असून नर बिबट्या आहे.

दरम्यान, डीएफओ रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या