रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्षपद निवडणूक; शिवसेनेच्या बंड्या साळवींची प्रचारात आघाडी

541

रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आघाडी घेतली आहे. प्रत्येक प्रभागात प्रचाराचा शुभारंभ करत त्यांनी जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. प्रचाराचे पत्रक घेऊन शिवसैनिकांसह घरी आलेल्या बंड्या साळवी यांचे नागरिक स्वागत करत आहे.

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी 29 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांनी प्रचारात सर्वप्रथम आघाडी घेतली. शहरातील 15 प्रभागात बैठका घेत जनतेशी सुसंवाद साधला. शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत यांनीही बैठकांमध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांचा अर्ज भरताना झालेली गर्दी त्यांच्या विजयाचे संकेत देणारी ठरली. त्यानंतर बंड्या साळवी यांच्या प्रचाराचा प्रत्येक प्रभागात शुभारंभ सुरु झाला. प्रभारी नगराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर चार महिन्यात शहरात कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून शहरात केलेल्या विकासकामांची माहिती आणि भविष्यातील संकल्पना घेऊन बंड्या साळवी आता घरोघरी भेटी देत आहेत. शहरवासियांच्या प्रश्नाची जाण आणि समस्या सोडविणारा नगराध्यक्ष जनतेला हवा आहे.असा कार्यतप्तर नगराध्यक्ष म्हणून रत्नागिरीकर बंड्या साळवींकडे पहात आहेत. प्रभाग 14 मध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय साळवी,विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे,शहरप्रमुख बिपिन बंदरकर,युवासेना शहर युवाधिकारी अभि दुडे, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे,नगरसेविका दया चवंडे, विभागप्रमुख राजन शेट्ये,उपविभागप्रमुखचंद्रकांत गावखडकर, माजी नगरसेवक भाया पावसकर तसेच सर्व प्रभागतील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या