
संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटावी याकरिता रत्नागिरी पोलिसांनी मारूती मंदिर येथे ‘मी मुर्ख…मी सेल्फीश’ हा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे या पॉईंटवर फोटोसेशन केले जाते.
अनेक दुचाकीस्वार विनाकारण बाहेर फिरून संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत. दंडात्मक कारवाई करूनही नियम तोडून मुर्खपणा करणाऱ्यांना त्यांची जागा पोलिसांनी दाखवली आहे. कारण नसताना उनाडक्या करणाऱ्यांचे सेल्फी पॉईंटवर फोटो घेतले जातात. शिक्षा म्हणून तासभर तिथेच बसवले जाते. मार्निंग वॉकला फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत कारवाईतून 37 लाखापेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.
























































