रत्नागिरीत टर्की पावडरसह तरुण ताब्यात, अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची कारवाई

रत्नागिरी शहरात पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणाला रंगहाथ पकडले. त्याच्याकडून ५० हजार ३५० रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त केला असून अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील माळनाका -थिबा पॉईंटकडून राजेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी एका कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी संशयित तरुणाला रंगहाथ पकडले.

मतिन महामुद शेख (वय 31, रा. ओसवालनगर रोड, उद्यमनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता 50 हजार 350 रुपयांचा टर्की (ब्राऊनहेराईन सदृश्य) हा अंमली पदार्थ व इतरा साहित्य त्याच्याकडे आढळले. यामध्ये 10 हजार 850 रुपयांची एक पारदर्शक प्लास्टीक पाऊच त्यामध्ये टर्की (ब्राऊन हेरॉईन सदृश्य) हा अमली पदार्थ असून त्याचे प्लास्टीक पिशवीसह वजन 2 ग्रॅमचे असून त्यामध्ये 31 पुडया आढळल्या. एका पुडीची किमंत 350 रुपये असल्याचे पुढे आले आहे. तर 31 लहान कागदाचे तुडे टर्की पावडर ब्राउन हेरॉईन च्या पुड्या बांधण्यासाठी. तसेच संशयिताच्या खिशात एक लायटर, एक सिगारेट, एक मोबाईल हॅण्डसेट 4 हजार 500 रुपयांचा व 35 हजाराची दुचाकी असे एकूण 50 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलिस हेड कॉनस्टेबल योगेश नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र मद्य, अंमली पदार्थ, मद्य विक्री यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत असतानाही त्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्यामुळे तरुणाई मद्य, अमली पदार्थ्यांच्या विळख्यात अडकत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.