
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, बाजारपेठ, बंदरे आणि रेल्वे स्थानकांवर पोलीस गस्त घालत आहेत. सर्व चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या कंपन्या, सागर रक्षक दल आणि ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. नागरिकांना संशयित व्यक्ती, वस्तू किंवा हालचाली दिसल्यास तात्काळ दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२२२, कोस्टल हेल्पलाईन १०९३ वर किंवा डायल ११२ वर संपर्क करावा. पोलिसांच्या समुद्र संदेश किंवा रत्नागिरी पोलीस या व्हॉटसॲप चॅनेल वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.




























































