
बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी रत्नागिरीतील साई हाॅस्पिटलवर जिल्हा आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या रुग्णालयाचा बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचा परवाना रद्द करण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी ही माहिती दिली.
गर्भपात केंद्राला मान्यता नसतानाही गर्भपाताच्या गोळ्या देऊन साई हाॅस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात येत होते. सद, बाब उघडकीस आल्यानंतर हाॅस्पिटलवर कारवाई करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप यांनी गर्भपातासाठी डमी पेशंट पाठवून डॉ.अनंत शिगवण याचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. डॉ. शिगवणवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई हॉस्पिटलच्या डॉ.अनंत शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यानी साईं हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचा परवाना रद्द केला आहे.