Ratnagiri News – महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी चिपळूणात धडक आंदोलन, महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार

स्मार्ट मीटर लावण्यासाठी होत असलेली सक्ती आणि महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सोमवारी (4 जुलै 2025) सकाळी 11 वाजता चिपळूणमध्ये महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे. चिपळूणच्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

चिपळूण नगर परिषदेने वीजबील थकवले सांगून महावितरणने शहरातील विद्युत पुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास दिला त्याचाही जाब उद्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले. त्याचबरोबर वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि स्मार्ट मीटरची होत असलेली सक्ती याबाबत उद्याच्या मोर्चात आवाज उठवला जाणार आहे. या मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, माजी आमदार रमेश कदम, कॉंग्रेसच्या जिल्हाधक्ष सोनलक्ष्नी घाग व इतर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.