
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका 20 वर्षीय तरुणाचा नाहक बळी गेला आहे. तसेच अन्य एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील हायस्कुलच्या तीव्र उतारावर भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रेलर चालकाचे गाडीवरीन नियंत्रन सुटले आणि त्याने 3 दुचाकी आणि दोन कारला धडक दिली. या धडकेच चारजण किरकोळ जखमी झाले आहे. मात्र शिवम रवींद्र गोताड (20) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून निशांत कळंबटे (20) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हे दोघेही रत्नागिरी आयटीआय येथे शिक्षण घेत होते. बुधवारी (17 सप्टेंबर 2025) अपघाताच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून झरेवाडीकडे जात होते. मात्र, याच दरम्यान हतखंबा येथील हायस्कुलसमोर ते आले असता मागून आलेल्या ट्रेलरने त्यांना जोराची धडक दिली. या भयंकर अपघातात शिवम जागीच ठारा झाला तर निशांतवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपस्थितांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहूतक सुरळीत करत एक मार्गे सुरू केली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.