Ratnagiri News: रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचे नाशिक कनेक्शन? बेपत्ता तरुणीचे वडील उद्या रत्नागिरीत येणार

रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणी ही नाशिकची असण्याची माहिती पुढे आली आहे. नाशिक येथून एक पंजाबी तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार पिंपळगाव बसवंतनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्या मुलीचे वडील उद्या रत्नागिरीत पोहचणार आहेत. तिच्या सापडलेल्या वस्तू वरून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रविवारी रत्नदुर्ग किल्ल्यावरून दुपारी एक तरूणी खाली पडल्याची घटना घडली होती. तीने रेलिंगजवळ तिच्या चप्पला, जॅकेट आणि ओढणी ठेवली होती. दरम्यान, दोन दिवस पोलीस त्या तरुणीचा शोध घेत होते. आज रत्नागिरीतील एका बॅंक कर्मचाऱ्यांना त्या तरूणीने त्याला दुसऱ्याच्या फोन वरून फोन केल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्या तरूणीच्या वडीलांशी संपर्क साधण्यात आला आहे. ते हरियाणामध्ये असून उद्या ते नाशिकला येणार आहेत आणि त्यानंतर रत्नागिरीत येणार आहेत. त्या तरूणीच्या सापडलेल्या वस्तूंवरून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नाशिक मधील तरूणीच्या घरात सुसाईड नोट

रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरून तरूणी पडल्याची बातमी नाशिक मधील वृत्तपत्रात आली होती .दरम्यान, नाशिक येथील बॅंकेत काम करणारी ही तरूणी शनिवारी-रविवार सुट्टी असल्याचे सांगून गावी जाते सांगून निघून गेली होती. सोमवारी ती न आल्यामुळे तेथील लोकांना संशय आला तेव्हा, त्या लोकांनी चावी घेऊन तिची खोली उघडली. यावेळी त्यांना सुसाईड नोट सापडली. या लोकांनी पिंपळगाव बसवंतनगर येथील पोलीस ठाण्यात तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. उद्या या तरुणीचे वडील सर्वप्रथम नाशिकला येणार आहेत. त्यानंतर ते रत्नागिरीत येतील. तेव्हा तरूणीच्या सापडलेल्या वस्तू वरून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जाणार असून मृतदेह सापडल्यानंतर निश्चित ओळख पटेल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी दिली.