
प्रगती अभियानांतर्गत फिर्यादीला गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीबाबत सर्व माहिती त्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीला तपासातील प्रगतीची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. फिर्यादीला सर्व माहिती मोबाईलवर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईन मो.क्र. 9684708316 आणि 8390929100 यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले.यावेळी त्यांनी सर्व पोलीस ठाणे आणि अधिकारी वर्गाचे मोबाईल क्रमांक जाहिर केले.यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.